kunal kamra saam tv
महाराष्ट्र

Kunal Kamara: शिंदेंचं विडंबन कामराला भोवणार? कामराला जनतेतून कोट्यवधींची देणगी, शिंदे गटाने केली चौकशीची मागणी

Political Storm Over Satire: शिंदेंवरच्या टीकेनंतर कुणाल कामराचा पाय आणखीच खोलात गेलाय.. कुणाल कामराविरोधात शिंदे गट आणखी आक्रमक झालाय.. तर शिंदे गटाने नेमकी काय मागणी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने केलेलं विडंबन शिंदे गटाला चांगलंच झोंबलंय.. शिंदे गटाने आधी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करत गुन्हा दाखल केला..त्यानंतर कुणाल कामराच्या खात्यात देश विदेशातील प्रेक्षकांकडून मदतीचा ओघ सुरु झालाय.. आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आलीय.. हाच धागा पकडून संतापलेल्या शिंदे गटाने कामराला मिळालेल्या देणगीची चौकशी करण्याची मागणी गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार करत केलीय..

शिंदेंच्या तक्रारीत नेमकं काय? (HEADER)

कामराच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांबद्दल शंका

कामराला देश-विदेशातून निधी मिळाल्याचा संशय

कामराला मिळालेल्या विदेशी निधीच्या स्त्रोतांची चौकशी करावी

कुणाल कामराने शोमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे गद्दार असा उल्लेख केला होता.. या प्रकरणी कामराला मद्रास उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलंय.. मात्र आतापर्यंत नेमकं काय घडलंय? पाहूयात...

कुणाल कामराच्या अडचणी वाढणार?

कुणाल कामराची शोमधून शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

कामराच्या हॅबिटॅट स्टुडिओची शिंदे गटाकडून तोडफोड

कामराविरोधात शिंदे गटाकडून गुन्हा दाखल

कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा 7 एप्रिलपर्यंत दिलासा

कामराने वकिलामार्फत बाजू मांडल्याची माहिती

कुणाल कामराला पोलिसांची तिसरी नोटीस

कुणाल कामरा स्टँड अप कॉमेडीच्या माध्यमातून युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरुन लाखो रुपये कमावतो... मात्र शिंदेंवरील टीकेनंतर कामराला देण्यात येणाऱ्या देणगीत वाढ झालीय.. त्यामुळे कामराला देणगी देणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य चाहते आहेत की देश-विदेशातील संघटना? याची चौकशी होणार आहे.. त्यामुळे या अग्नीपरीक्षेतून कुणाल कामरा सहीसलामत सुटणार की शिंदे गटाच्या तक्रारीमुळे अडचणीत येणार? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT