krishna river sangli Accident News krishna river sangli Accident News
महाराष्ट्र

Sangli Accident: मध्यरात्री भरधाव गाडी कृष्णा नदीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू, ३ जणांची प्रकृती गंभीर

sangli krishna river Accident: सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून तीन जण ठार झालेततर ३ जण गंभीर जखमी आहेत.

Namdeo Kumbhar

krishna river sangli Accident News : लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळली. सांगलीमधील अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून भरधाव गाडी नदीपात्रात कोसळून तीन जण ठार झालेत. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमी मध्ये एका 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

रात्री एकच्या सुमारास कोल्हापूर वरून सांगलीकडे येताना अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबीय सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी. अपघातानंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. अपघातामधील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत. कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते. त्यावेळी भीषण अपघात झाला.

गाडी जयसिंगपूर हून सांगलीकडे येत असताना अंकली पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव असणारी गाडी थेट नदी पात्रात कोसळली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी आहेत.

मृतांमध्ये प्रसाद भलचांद्र खेडेकर 40, प्रेरणा प्रसाद खेडेकर 35, वैष्णवी संतोष नार्वेकर 23 यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर 42, वरद संतोष नार्वेकर 21 आणि समरजित प्रसाद खेडेकर या 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे. हे सर्व सांगली आकाशवानी केंद्रामागे असणाऱ्या गंगाधर नगर येथील रहिवाशी आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT