Shirdi Koyata Gang Saam TV
महाराष्ट्र

Shirdi News : साईबाबांच्या शिर्डीत कोयता गँगचा धुमाकूळ; मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाला लुटले, धक्कादायक VIDEO

Shirdi Koyata Gang News : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला कोयता गँगच्या गुंडांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीतून समोर आलाय.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही

एकीकडे पुणे शहरात कोयता गँगचे गुंड धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे शिर्डीत देखील कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय. कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला कोयता गँगच्या गुंडांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीतून समोर आलाय. लुटमारीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून साईभक्तांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कोयता गँगच्या (Koyata Gang) गुंडांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जातेय. त्यामुळे पोलिसांसमोर या गँगला पकडण्याचं आव्हान उभं राहिलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील (Shirdi News) हॉटेलमध्ये कुक असणारा तरुण मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होता. या तरुणाला वाटेतच अज्ञात आरोपींने अडवले. कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे तसेच मोबाइल लुटून आरोपी फरार झाले.

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. शिर्डीत अचानक कोयता गँग सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोयता गँगची दहशत मोडीत काढण्याचे आव्हान शिर्डी पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

पुण्यात कोयता गँगने वाईन शॉप फोडले

पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ऐन गटारीच्या दिवशीच कोयता गँगच्या टोळक्याने एका वाईन शॉपची तोडफोड केली. शहरातील कॅम्प परिसरात रविवारी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा  व्हिडीओ समोर आला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT