waterfall, satara, kolhapur, radhanagari dam, koyna dam saam tv
महाराष्ट्र

Koyna Dam Water Level: दिलासादायक... सातारा, काेल्हापूरात पावसाचा जाेर वाढला; जाणून घ्या राधानगरी, काेयनेतील पाणीसाठा

Satara Dam Water Level: आज सकाळ पासून सातारा शहरात पावसाची संततधार सुरु आहे.

Siddharth Latkar

Western Maharashtra Rain Update : सातारा (satara) आणि काेल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात विशेषत: काेयना, राधानगरी भागात पावसाचा जाेर आहे. या भागात पडत असलेल्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील काेयना धरण (koyna dam) आणि काेल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील (radhanagari dam) पाणी साठ्यात वाढ हाेऊ लागली आहे. दरम्यान या दाेन्ही धरण साठ्यात अपेक्षीत अशी वाढ नसल्याने शेतक-यांना त्यांच्या आगामी काळातील शेतीची चिंता सतावत आहे.(Maharashtra News)

काेयनेत पावसाचा जाेर

काेयना धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनूसार आज (साेमवार) सकाळी आठ वाजता काेयना धरणांत (25.89 टीएमसीसी) इतका पाणीसाठा आहे. धरणात गत 24 तासात 10 हजार 694 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे.

गेल्या दाेन दिवसांत पावसाने जाेर धरल्याने सातारा शहरातील कास नजीकच्या एकीव, वजराई, महाबळेश्वरच्या लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची माेठी गर्दी होऊ लागली आहे.

राधानगर धरण ५० टक्के भरले

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण आज ५० टक्के भरले. या धरणात गतवर्षी १६ जुलैला ५.६५ टीएमसी पाणीसाठा होता यंदा तो ४.१८ टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान राधानगरीचा पाणीसाठा काेल्हापूरवासियांसाठी दिलासादायक असल्याचे बाेलले जात आहे.

काेल्हापूर जिल्ह्यातील धरण/ प्रकल्पांतील तुलनात्मक पाणीसाठा

धरण/प्रकल्प-एकूण क्षमता- १६ जुलै २०२३-१६ जुलै २०२२

राधानगरी- ८.३६ टीएमसी - ४.१८ टीएमसी - ५.६५ टीएमसी

तुळशी- ३.४७- १.०१- २.२८

वारणा- ३४.३९- १५.३६- २३.७५

दूधगंगा- २५.३९- ५.२४ - १४.६३

कासारी- २.७७- १.२२- १.९७

कडवी- २.५१- १.१५-१.८५

कुंभी- २.७१- १.४६ - १.७६

पाटगाव- ३.७१- १.४७- २.३८

चिकोत्रा- १.५२- ०.४७ - १.०२

चित्री- १.८८- ०.४५- १.२९

जंगमहट्टी- १.२२-०.३६- १.०३

घटप्रभा- १.५६- १.५६- १.५६

जांबरे- ०.८१- ०.५९- ०.८२

आंबेओहोळ- १.२४- ०.४१- १.०९

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghavan recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट करा कोकणी स्टाईल स्वादिष्ट घावणे, वाचा सोपी रेसिपी

Saturday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींनी आरोग्याकडे द्या विशेष लक्ष; वाचा आजचे राशीभविष्य

Saturday Horoscope : पार्टनरशी कडाक्याची भांडण होईल, महत्वाचा निर्णय पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; वेतन वाढीचे थकीत हप्ते कधी मिळणार? तारीख आली समोर

ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीचं गुपित उघड, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT