Kopargaon News Saam tv
महाराष्ट्र

Kopargaon News: धावत्या बसमध्येच महिलेचा मृत्यू

धावत्या बसमध्येच महिलेचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

कोपरगांव (अहमदनगर) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा धावत्या बसमध्ये (St Bus) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव (Kopargaon News) परिसरात घडली आहे. ही महिला बसमध्ये अचानक बेशुद्ध पडल्याने चालक- वाहकाने बस थेट ग्रामीण रुग्णालयात (Hospital) नेली. मात्र तिथे डॉक्टरने तीला मयत घोषित केले. (Kopargaon Today News)

नबाबाई सोनवणे (वय ४५) या नंदुरबारला जाण्यासाठी आपल्या नातेवाईकांसह अहमदनगर (Ahmednagar) येथून श्रीगोंदा- धुळे (Dhule) बसमध्ये बसल्या होत्या. मात्र बस कोपरगाव परिसरात आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला आणि धावत्या बसमध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यावेळी आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनुसार वाहकाने मृत महिलेच्या नातेवाईकांना पुढील प्रवासाच्या तिकिटाचे पैसे परत करत माणुसकीचे दर्शन घडवले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT