Ahmednagar News Saam Tv
महाराष्ट्र

कोपरगावात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबीन खान

अहमदनगर - कोपरगाव (Kopargaon) शहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहीहंडी उत्सवमचे स्वागत कमान उभारण्यात येत असल्याने भाजपचे कार्यकर्त्यांनी त्याला विरोध दर्शविला.

त्यामुळे मंगळवारी दिवसभर दोन्ही गट आमने-सामने आले होते, आणि रात्रीच्या सुमारास भाजपा आणि राष्ट्रवादच्या दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली, त्यामूळे काही काळ तनावाचं वातावरण निर्माण झालं होतं ,जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

हे देखील पाहा -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अश्या घोषणा दिल्या तर भाजप कार्यकर्त्यांनी विवेक कोल्हे व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या.

त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र कोपरगाव शहर पोलीस व शीघ्र कृती दलाचे जवान वेळीच घटना स्थळी दाखल झाले व जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी पळताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे किरकोळ जख्मी झाले.

दरम्यान, ज्या स्वागत कमानीवरून वाद सुरू झाला ती कमान पोलिसांनी लगेचच हटवली आहे. प्रशासनाला जर कमान हटवायची होती तर मग दिवसभर वाट का पाहिली असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT