Nilesh and Nitesh Rane in the spotlight as the Shinde Sena–BJP rivalry heats up in Sindhudurg. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: निलेश बळीचा बकरा; राणेंचा थेट आरोप, राजकरणात खळबळ

Plot to Finish Narayan Rane: कोकणात शिंदेसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष अधिकच चिघळत चाललाय...मात्र नितेश राणेंनी आपले बंधू निलेश राणेंची बाजू घेतली आहे. तर नारायण राणेंना संपवण्याचा कट रचला जातोय, असं विधान शिंदेंसेनेच्या बड्या नेत्यानं केलंय.

Suprim Maskar

तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना या मित्रपक्षांमध्येच धुमशान सुरुये...त्यातच भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात बेकायदेशीपणे घुसल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानं शिंदेसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष अधिकच चिघळत चाललाय..गुन्हा पकडून देणाऱ्यांवर केसेस होतायत, असा टोला निलेश राणेंनी लगावलाय... तर निलेश राणेंना एकटं पाडून बळीचा बकरा बनवले जातंय, अशी टीका नितेश राणेंनी केलीय...

मात्र दुसरीकडे शिंदेसेनेच्या दीपक केसरकरांनी थेट नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट रचला जातोय, असं विधान करून खळबळ उडवून दिलीय तर राणेंची काळजी शिंदेसेनेनं करू नये, असा सल्ला नितेश राणेंनी दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे पिता-पुत्रांचं नेहमीचं वर्चस्व राहिलयं... मात्र नितेश राणे भाजपात आणि निलेश राणे शिंदेसेनेत असल्यानं पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचं पालन करून सत्तेसाठी कार्यरत राहण्याशिवाय त्यांना गंत्यतर नाही... त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कणकवली आणि सिंधुदुर्गमध्ये शिंदेसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटल्यानं विरोधकांच्या हातीही आयतं कोलीत मिळालयं...

तळकोकणात शिंदेसेना आणि भाजप आमनेसामने आल्यानं राणे कुटुंबातील वादही चव्हाट्यावर आलाय.आता नारायण राणे तळकोकणातील आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी काय रणनीती आखतात... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर तरी महायुतीतील हा वाद शमणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT