ZP Election Result Saam Tv
महाराष्ट्र

ZP Election Result: कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, महिला कार्यकर्त्यांनी केळी दाखवून डिवचलं

Kolhapur ZP Election Result: कोल्हापुरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपने काँग्रेसचा दारुण पराभव केला. त्यामुळे सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला. विजयोत्सव साजरा करताना भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवारांना केळी दाखवून डिवचलं.

Priya More

Summary -

  • कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत उचगाव मतदारसंघ भाजपने जिंकला

  • काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव

  • आमदार सतेज पाटील यांना या निकालामुळे मोठा धक्का बसला

  • महिला कार्यकर्त्यांनी केळी दाखवून विरोधकांना डिवचलं

कोल्हापुरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेचे नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला. कोल्हापुरच्या उचगाव मतदारसंघात एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भाजप उमेदवार विजयी झाला. भाजप उमदेवारांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळत आणि जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पराभूत उमेदवारांना केळी दाखवून जल्लोष साजरा केला.

कोल्हापुरातील उचगाव मतदारसंघ हा काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा बालेकिल्ला समजला जात होता. याच मतदारसंघात भाजपने प्रतिस्पर्धी उमेदवार दिला होता. उचगाव मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नामदेव वाईंगडे यांचा विजय झालेला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कीर्ती कुमार मसुटे यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्लातच काँग्रेसच्या उमेदवाराचा भाजप उमेदवाराने पराभव केला.

काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. तर काही महिलांनी थेट हातात केळी घेऊन पराभूत उमेदवाराला डिवसण्याचा प्रयत्न केला. याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake: इराणवर निसर्गाचा प्रकोप; युद्धाच्या भडक्यात अणू प्रकल्पांजवळ भूकंप

Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

धुळवडीनंतर धुरळा उडणार; ७ राज्यात निवडणुकीची घोषणा होणार, वाचा सविस्तर

Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या गोटमार यात्रेत अनेक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT