Kolhapur Youth Fall Down Amboli Ghat Saam Tv News
महाराष्ट्र

रेलिंगच्या पलीकडे रुमाल उडाला, काढायला गेला असता कोल्हापूरचा युवक आंबोली घाटात पडला; पोलिसांकडून शोधमोहीम सुरु

Kolhapur Youth Fall Down Amboli Ghat : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाटाजवळील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Prashant Patil

कोल्हापूर : मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर आता पावसाने दडी मारल्यानं निसर्गरम्य वातावरणात मजा लुटण्याचा, पर्यटकाचा आनंद पर्यटक घेत आहेत. मात्र, प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाटाजवळील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे. वाऱ्यांच्या वेगामुळे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे.

कोल्हापूरमधून मित्राचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटात या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, दुर्दैवाने यावेळी एक युवक रेलिंगच्या पलीकडे जाऊन दरीत कोसळल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. युवक नेमका दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जात आहे, पण रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT