Kolhapur AI Photo
महाराष्ट्र

Kolhapur: बायको रूसून माहेरी, नवऱ्याने व्हिडिओ कॉल करत गळ्याभोवती लावला फास; तोल गेला अन्...

Mans Threat Becomes Reality in Kolhapur: व्हिडिओ कॉलवर पत्नीला आत्महत्येची धमकी देणाऱ्या पतीचा गळ्याभोवती फास घट्ट बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

Bhagyashree Kamble

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंकले तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. माहेरी गेलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर "ताबडतोब घरी ये, नाहीतर फास लावून घेईन", अशी धमकी देत असताना तरूणाच्या गळ्याभोवती खरोखरच फास बसला अन् त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. पत्नीच्या डोळ्यादेखत तरूणाचा जीव गेला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अभिजीत दत्तात्रेय माने (वय वर्ष ३८) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. हा तरूण पुण्यात फॅब्रीकेशनची कामे करत होता. गुढीपाडव्यानिमित्त तो पुण्याहून कोल्हापुरात गेला होता. मात्र, कोल्हापुरात जायच्या आधी अभिजीतची पत्नी आपल्या दोन मुलांसह माहेरी निघून गेली होती. मानेला दारूचे व्यसन होते. यातून पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत. याच वादाला कंटाळून तिने माहेर गाठले.

शनिवारी अभिजीतने आपल्या पत्नीला कॉल केला होता. "ताबडतोब घरी ये, नाहीतर मी आत्महत्या करेन", असं तो म्हणाला होता. धमकी देऊनही पत्नी काही बोलायला तयार नाही. त्याने नंतर पंख्याला ओढणी बांधली आणि ओढणीचा फास आपल्या गळ्याभोवती अडकवला. त्याने पुन्हा पत्नीला धमकी दिली. मात्र, धमकी देत असतानाच त्याचा तोल गेला आणि हा गळ्याभोवती बसलेला फास घट्ट झाला. पत्नीच्या डोळ्यादेखत अभिजीतचा तडफडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT