kolhapur ganpati festival saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival 2023 : कार्यकर्त्यांनाे ! लेझर शोला बंदी, सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना कोल्हापुर पाेलिसांचा कारवाईचा इशारा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून वॉच टॉवर उभे करणार आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Ganesh Festival 2023 : कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत घातक लाईट इफेक्ट्सला बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश पाेलिसांनी सर्व सावर्जनिक गणेशाेत्सव मंडळांना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-या गणेशाेत्सव मंडळांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra News)

कोल्हापुरात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत गतवर्षी लाईट इफेक्ट्सचा वापर करीत मंडळांनी नागरिकांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत लावण्यात आलेल्या घातक विद्युत रोषणाईमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली हाेती.

त्याचप्रमाणे मोबाईलच्या कॅमेराच्या लेन्स देखील खराब झाल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना लाईट इफेक्टसचा वापर करुन नये असा थेट इशारा दिला आहे. नागरिकांच्या आराेग्यास घातक ठरेल अशा गाेष्टी करुन नयेत असे मंडळांना पाेलिसांनी स्पष्ट सांगितले आहे. नियमांची पायमल्ली करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

गणेशाेत्सवासाठी महापालिका सज्ज

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून वॉच टॉवर उभे केले जाणार आहेत. पुढील दोन दिवसात कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात आयुक्तांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT