Koratkar News Saam
महाराष्ट्र

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या मुसक्या कशा आवळल्या? पोलिसांनी सांगितला अटकेचा थरार

Prashant Koratkar Latest News : प्रशांत कोरटकरच्या तेलंगणातून मुसक्या आवळल्या आहेत. या प्रशांत कोरटकरला अटक कशी झाली, याचा थरार पोलिसांनी सांगितला.

Vishal Gangurde

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटरला तेलंगणातून ताब्यात घेतलं आहे. छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर कोरटकर फरार होता. याच प्रशांत कोरटकरला अटक कशी झाली, याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रशांत कोरटकरच्या अटकेरचा थरार सांगताना म्हटलं की, 'कोरटकरला अटक करताना कोल्हापूरचे पोलीस पथक देखील होतं. राजवाडा पोलीस स्टेशनचेही पथक होते. स्थानिक गुन्हे शाखेचे देखील पोलीस होते. काही माहिती प्रसार माध्यमांतूनही मिळत होती. तो चंद्रपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याठिकाणी जाऊन देखील चौकशी करण्यात आली'.

'राजवाडा पोलिसांनी तिकडे जाऊन चौकशी केली. टोलनाक्यावरचे फुटेज तपासले. काही वाहने तपासले. एका फुटेजमध्ये तो वाहनाने जात असल्याचा आढळला. त्यानंतर पोलिसांची पुढील पथके तेलंगणाला रवाना झाली. त्यानंतर तेलंगणातून त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी प्रशांत कोरटकरला कोल्हापूरला आणलं जाईल. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात येईल. मागील एक महिन्यापासून म्हणजे गुन्हा घडल्यापासून आरोपीने कोणत्या कोणत्या वाहनाचा वापर केला, हे तपासलं जाईल. तसेच कुठे कुठे लपला, याची देखील माहिती घेतली जाईल. कोरटकरला ताब्यात घेतलं आहे. अद्याप अटक केलेली नाही. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला कोर्टात हजर करावं लागतं, असे पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.

'आरोपीला कोल्हापूरला आणतील. अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत सर्व गोष्टींची चौकशी होईल. त्याला कुणीही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सध्याच्या युगात फरार आरोपीचा तपास करतो. तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते. परंतु जर आरोपी ते वापरत नसेल तर तांत्रिक तपासावर मर्यादा येते. माहितगार लोकांकडून माहिती घेतली जाते. थोडा वेळ जातो. पण रिझल्ट मिळतो, असे पोलीस अधिक्षकांनी पुढे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT