गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करण्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी कडक केलीय. पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या चार महिलांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलाय. राज्यात गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे, काही मंडळात पाच दिवस गणपती बसला जातो. श्रीगणेशाचं आगमन आणि गणेश विसर्जनामळे मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत डीजेवर गाणं लावलं जातं.
मात्र कोल्हापूरमधील एका गणेश मंडळाला मात्र मिरवणूक काढणं चांगलेच महागात पडलयं. कोल्हापूर पोलिसांनी अश्लील डान्स करणाऱ्या डान्स ग्रुपला कोल्हापूर पोलिसांचा दणका दिलाय. करवीर पोलीस ठाण्यात तब्बल १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेश भाविक भाग घेत असतात. . गणेश भाविक डीजे, बँड बाजा वाजवत मिरवणूक काढत असतात. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातही अशीच मिरवणूक काढली. परंतु या विसर्जनाच्या मिरवणुकीत करण्यात आलेल्या डान्समुळे या मिरवणुकीला गालबोट लागलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या म्हारूळ या गावी गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या डान्स ग्रुपवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126 (2) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेश मंडळांना केलेला आवाहन कार्यकर्त्यांनी जुगारलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.