jayshree jadhav: जयश्री जाधव झाल्या भावुक SAAM TV
महाराष्ट्र

jayshree jadhav: जयश्री जाधव झाल्या भावुक; म्हणाल्या, हा कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय!

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर जयश्री जाधव या भावुक झाल्या होत्या.

ब्युरो रिपोर्ट, सामटीव्ही

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या भावुक झाल्या होत्या. कोल्हापूरच्या जनतेनं दिलेला शब्द पाळला. अण्णांच्या नंतर माझी जी जबाबदारी घेतली होती, ती पूर्ण केली आहे. हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आणि महाविकास आघाडीचा आहे, अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव (jayshree jadhav) यांनी दिली.

राज्यातील प्रतिष्ठेच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur north by election result) महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना पराभूत केलं. या विजयानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवार जयश्री जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या भावुक झाल्या होत्या. 'कोल्हापूर जनतेनं आपला शब्द पाळला आहे. अण्णांच्या नंतर माझी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. कोल्हापूर जनतेनं स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीनं जी जबाबदारी घेतली होती, ती पूर्ण केली आहे. सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते, सर्व स्वाभिमानी जनता या सगळ्यांनी मिळून जबाबदारी पूर्ण केली आहे. सतेज पाटील, मुश्रीफ, राजे कुटुंबीय, क्षीरसागर आणि जनता या सर्वांनी मदत केली. हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा, महाविकास आघाडीचा आहे. अण्णांनी जे पेरलं ते उगवलं, असे ते म्हणाल्या.

'अण्णांचं स्वप्न पूर्ण केलं याचा आनंद आहे'

विजयानंतर पहिलीच प्रतिक्रिया देताना जयश्री जाधव या भावूक झाल्या होत्या. मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होतीच. जनता आमच्यासोबत होती. त्यांनी संपूर्ण सहकार्य केले. आपलं कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं आहे. महाविकास आघाडीचा विजय होणारच होता. चंद्रकांत पाटील यांनी जो दावा केला होता, तो फोल ठरला आहे. अण्णांचं स्वप्न पूर्ण होतंय, याचा मला आनंद होतो. अण्णांचा आशीर्वाद आहे. ते तळागाळात पोहोचले होते. त्यांच्यावरचं असलेलं प्रेम जनतेनं व्यक्त करून दाखवलं आहे, असं जयश्री जाधव म्हणाल्या. कोल्हापूरची सेवा करीन, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT