Sanjay Raut Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'भाजपनं गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांना...' संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

माझ्यासमोर बसलेत ते खरे वाघ आहेत. खऱ्या वाघांशी लढणं भाजपनं गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांना जमणार नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली... (Sanjay Raut News)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kolhapur: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज थेट विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. राज्यातील विधीमंडळाला चोरमंडळ असं संबोधल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

त्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. या संपूर्ण गोंधळानंतर संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या सभेतून उद्योजक गौतम अडानी यांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हिंमत असेल तर अदानींना नोटीस पाठवा असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत...

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हपूरमध्ये त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘माझ्यासमोर बसलेत ते खरे वाघ आहेत. खऱ्या वाघांशी लढणं भाजपनं गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांना जमणार नाही. वाघाचं कातडं पांघरून वावरणारे निघून गेले, अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.

यावेळी बोलताना हिंमत असेल तर आत्ता निवडणूक घ्या, जनता तुम्हाला धडा शिकवेल असे म्हणत सत्य काय आहे ते २०२४ मध्ये समजेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

चोरमंडळ वक्तव्यावर दिले स्पष्टिकरण...

"चाळीस चोरांनी आमच्या विधिमंडळाचं चोर मंडळ केले असे मी म्हणालो. पण लगेच सभागृहात गोंधळ सुरु झाला. आम्हाला विधानसभेविषयी लोकसभेविषयी आदरच आहे. पण एका चिन्हावर निवडून यायचं, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून यायचं उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी रक्त आटवायचं आणि निवडून आले की पळून जायचं. या चोर मंडळाला आपल्याला कायमचा धडा शिकवायचा आहे," असं ते यावेळी म्हणाले. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT