Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News: बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिंनीने संपवलं जीवन; पेपर अवघड गेल्याने उचललं टोकाचं पाऊल

मोरेवाडी कोरेनगर इथे ही विद्यार्थिनी राहत होती.

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर : बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. पेपर अवघड गेल्याने तिने हे टोकचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे. मोरेवाडी कोरेनगर इथे ही विद्यार्थिनी राहत होती.

लीया रुकडीकर असं विद्यार्थीनीचं नाव आहे. लीया परीक्षेच्या तणावाखाली असल्याचं तिच्या कुटुंबियांच्याही लक्षात आलं होतं. तिच्या वडिलांनी तिची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र आज दुपारी राहत्या घरी तिने आत्महत्या करत जीवनं संपवलंय. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी वडिलांनी तिला फोन केला होता तेव्हा तिने आपल्याला बरं वाटत नसल्याचं सांगितलं होतं. आई शिक्षिका असल्याने त्या देखील शाळेत गेल्या होत्या. आजीसोबत लीया घरी एकटीच होती.

काही वेळानंतर वडील घरी आले असता त्यांनी लीयाला आवाज दिला. मात्र तिच्या रुममधून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी कसाबसा रुमचा दरवाजा उघडला. त्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT