Kolhapur संभाजी थोरात
महाराष्ट्र

दुर्दैवी: गाढ झोपेत असताना मायलेकीला विषारी नागाचा दंश; शाळकरी मुलीचा मृत्यू

विषारी नाग चावल्याने एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर: कोल्हापूरमधून (Kolhapur) एक दु:खद बातमी समोर आली आहे. रात्री गाढ झोपेत असताना शाळकरी मुलीवर काळाने घाला घातला आहे. मायलेकी झोपेत असताना मध्यरात्री एका विषारी नागाने दोघींना दंश केल्याची घटना कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील (Karveer Taluka) भामटे गावात घडली आहे.

विषारी साप (Snake) चावल्याच्या अनेक घटना आपण पाहात असतो. साप चावल्यावर त्याच्यावर उपचार देखील उपलब्ध आहेत. मात्र काल कोल्हापूरमधील घटनेत विषारी नाग चावल्याने एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

ज्ञानेश्वरी यादव असं मृत मुलीचे नाव आहे. तर आई नीलम यादव यांची ही प्रकृती चिंताजनक आहे. या घडलेल्या घटनेत शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या पावसाळाचे दिवस असल्याने सापांच्या वारुळामध्ये पाणी शिरते त्यामुळे या दिवसांमध्ये साप निवारा शोधत घरांमध्ये शिरतात. त्यामुळे नागरिकांनी, प्रामुख्याने गावाकडील लोकांनी जनावरांच्या गोट्यात आणि रानातील कामंं करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. जेणेकरुन त्यांना सर्पदंश होणार नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT