Kolhapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Kolhapur News : शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यातील फिर्यादी असलेला विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी आणि आरोपी अनिकेत कांबळे यांनी एकमेकांवर गोळीबार

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 
कोल्हापूर
: कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून फिर्यादी आणि आरोपी यांनी एकमेकांवर गोळीबार केल्याचे समोर येत असून पोलिसांनी यात एक जणास ताब्यात घेतले आहे. 

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आदमापूर परिसरात सकाळच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. यात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यातील फिर्यादी असलेला विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी आणि आरोपी अनिकेत कांबळे यांनी एकमेकांवर गोळीबार केला आहे. दरम्यान या गोळीबारात कोणीही (Crime News) जखमी झाले नाही. मात्र आदमापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 

पोलिसांनी घेतले ताब्यात  

पूर्वव्यमानस्यातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहिती असून  आदमापूर परिसरात झालेल्या गोळीबार करणारा विनायक लाड याला भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रिवाल्वर देखील जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT