Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: शिंदे-ठाकरे गटाचा आता गणपती मंडळावरुनही वाद, बाप्पावर आली उन्हात थांबण्याची वेळ...

Thackeray Group Vs Shinde Group: शिंदे-ठाकरे गटाचा आता गणपती मंडळावरुनही वाद, बाप्पावर आली उन्हात थांबण्याची वेळ...

Satish Kengar

>> रणजित माजगावकर

Thackeray Group Vs Shinde Group:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद आता थेट गणरायाच्या मंडळांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. पक्ष, चिन्हा नंतर आता कोल्हापुरात एकाच मंडळावर ठाकरे आणि शिंदे सेनेने दावा केला आहे. मात्र या दोघांच्या भांडणामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला तब्बल पाच तास उन्हात ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे.

ठाकरे आणि शिंदे सेनेत पक्ष आणि चिन्ह कोणाची यावरून चांगलंच घमासान झाल्यानंतर आता गणेश मंडळ कोणाचे यावरूनही संघर्ष पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या संयुक्त शिवाजी चौक मंडळाच्या निमित्ताने हे दोन पक्ष आमने सामने आले. मात्र यात कायदेशीर बाजू शिंदे सेनेची स्ट्रॉंग असल्याने शिंदे सेनेने हे मंडळ काबीज केले.

मात्र आज दिवसभर झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्याची चर्चा राज्यभर चांगलीच रंगली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या या मंडळात यावर्षी फूट पडली. मंडळातील बहुतांश कार्यकर्ते शिवसेनेचे, मात्र जसा पक्ष विभागला तसे कार्यकर्तेही विभागले. त्यामुळे या मंडळावर दोन्हीकडून दावे केले गेले. यात पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घ्यायला सुरुवात केली असतानाच राजेश क्षीरसागर गटाच्या कार्यकर्त्यांनी रात्री मूर्ती आली आणि त्याची प्रतिष्ठापणा केली. त्यामुळे आज ठाकरे सेनेने सुद्धा याच मंडपात मूर्ती प्रतिष्ठापणा करण्याचा निर्धार करत बिंदू चौकातून मूर्ती पालखीत ठेऊन कूच केली. मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याने ठाकरे सेनेने तिथेच ठिय्या मारला.

तर तिकडे राजेश क्षीरसागर थेट मंडपात दाखल झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागली. त्यामुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. या मंडपात मूर्ती आणू देणार नाही. असा पवित्रा क्षीरसागर यांनी घेतला. त्यामुळे ठाकरे गटाने आणलेल्या मूर्तीचे नेमके काय होणार हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांना यश आले. राजेश क्षीरसागर यांनी मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून याच परिसरात इतरत्र मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यास संमती दिली. मात्र ठाकरे गटावर त्यांनी गंभीर आरोप केले.

एकूणच या सगळ्या वादानंतर छत्रपती शिवाजी चौकात एका मंडपात ही मूर्ती बसवण्यात अली. मात्र मूर्तीला घेऊन झालेल्या राजकारणाने उलटसुलट चर्चा रंगलीय. राजकारण एका बाजूला आणि भावना एका बाजूला ठेऊन वागण्याची गरज यामुळे निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 हजाराच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

Blast: नमाज पठण करताना मशिदीत भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध; दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

SCROLL FOR NEXT