Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध; २० गावांचा उद्या बंद, दिला कडक इशारा

Kolhapur News : कोल्हापूरची हद्दवाढ करावी; या मागणीसाठी मुंबईत बैठकांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीला आता कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समिती स्थापन

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा सर्व बाजूंनी विस्तार होताना दिसून येत आहे. यामुळे शहराची हद्दवाढ करण्याचा विचार सध्या महापालिकेत सुरु आहे. मात्र या प्रस्तावित हद्दवाढीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान या हद्दवाढीला विरोध केला जात असून या विरोधात आजूबाजूचा २० गावांनी एकत्रित येत उद्या (१७ जून) बंद पुकारण्यात आला आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विचार सध्या सुरु आहे. तर कोल्हापूरची हद्दवाढ करावी; या मागणीसाठी मुंबईत बैठकांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीला आता कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून तीव्र विरोध केला जात असून आंदोलनाची भूमिका देखील कृती समितीने घेतली आहे.

२० गावांचा एकत्रित निर्णय 

दरम्यान कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी; यासाठी मुंबईत पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक बोलावलेली आहे. तर दुसरीकडे कृती समितीच्या माध्यमातून उद्या १७ जून रोजी २० गावांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे. अर्थात हद्दवाढीच्या विषयाला या गावांमधून तीव्र विरोध केला जात आहे. यामुळे आगामी काळात या वीस गावांची काय भूमिका राहील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार 

दरम्यान २० गावे एकत्रित येत बंद पुकारला असून ग्रामीण भागातील जनतेच्या विरोधात जाऊन शासनाने कोणतीही भूमिका घेतली; तर आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर शहर हद्दवाढीचा विषय पुढील काळात अधिक तापणार असल्याचे चित्र सध्या तरी पाहण्यास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! आरसीबीच्या खेळाडूंचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT