Kolhapur-Nagpur Flight Ticket 
महाराष्ट्र

Kolhapur-Nagpur Flight: अंबाबाईचं दर्शनाला जायचंय? फक्त ९०मिनिटात नागपूरवरून गाठा कोल्हापूर

Kolhapur-Nagpur Flight Ticket: कोल्हापूर आणि नागपूर मार्गावर लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. 15 मे पासून या विमान सेवेला सुरुवात होणार आहे.

Bharat Jadhav

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूरकरांनो तुम्हाला अंबाबाई देवीचं दर्शन करायचंय? पण रस्त्याने जाण्यास वेळ लागतो. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या महिन्याच्या १५ तारखेपासून नागपूर ते कोल्हापूरदरम्यान विमान वाहतूक सेवा चालू करण्यात येणार आहे. कोल्हापूर-गोवा आणि कोल्हापूर- दिल्ली या नव्या मार्गावरील सेवांसह कोल्हापूर-नागपूर या मार्गावर आता सेवा सुरू केली जाणार आहे.

आठवड्यातील पाच दिवस १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसन व्यवस्था असलेल्या विमानाचे उड्डाण होणार आहे. याबाबतची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिलीय. खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर आणि नागपूर हवाई सेवा आहे.आठवड्यातील पाच दिवस कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होतेय. स्टार एअरवेजच्या विमानात 12 बिझनेस क्लास आणि 64 इकोनॉमी क्लास आसन व्यवस्था असणार आहे. विमान सेवा सुरू झाल्यानं कोल्हापूरमधील उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. कोल्हापूरचं विमानतळ आता नवनवीन भरारी घेऊ लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

Coal Mine Explosion : कोळसा खाणीत भीषण स्फोट; ३० कामगारांचा मृत्यू, १० जण अद्याप अडकले

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT