Kolhapur: महापालिका गाडीच्या धडकेत 4 वर्षाची चिमुरडी जागीच ठार  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: महापालिका गाडीच्या धडकेत 4 वर्षाची चिमुरडी जागीच ठार

संभाजीनगर येथे महानगरपालिकेच्या टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातामध्ये ४ वर्षाची बालिका जागीच ठार झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर : संभाजीनगर (Sambhaji Nagar) येथे महानगरपालिकेच्या टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातामध्ये (accident) ४ वर्षाची बालिका जागीच ठार झाली आहे. अन्वी विकास कांबळे (मूळ रा. वारे वसाहत, सध्या रा. रायगड कॉलनी) असे तिचे नाव आहे. अपघातामध्ये तिचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त जमावाने टेम्पोवर दगडफेक केले आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे. याघटनेविषयी पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विकास दिलीप कांबळे सध्या रायगड कॉलनी (Colony) येथे राहतात. त्यांचे वारे वसाहत येथेही घर आहे. ते खासगी शिकवणी घेतात. आज सकाळी ते मुलगी अन्वी बरोबर वारे वसाहत येथील घरी आले होते. १२ वाजेच्या सुमारास ते मोटरसायकलवरून अन्वीला घेऊन रायगड कॉलनीकडे जात होते.

त्यावेळी संभाजीनगर मार्गे रेसकोर्सच्या दिशेने महानगरपालिकेचा (corporation) एक टेम्पो जात होता. त्या टेम्पोचा आणि कांबळे यांच्या मोटरसायकलचा गॅस एजन्सीच्या समोरच्या रस्त्यावर अपघात झाला आहे. यामध्ये टेम्पोखाली मोटारसायकल जाऊन अन्वी गंभीर जखमी झाली तर कांबळे यांच्या हाता पायाला दुखापत झाली आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक लगेच जमा झाले. त्यांनी जखमींना उपचाराकरिता सीपीआरमध्ये (CPR) दाखल करण्यात आले आहे. पण उपचाराअगोदरच अन्वीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.

तसेच संतप्त जमावाने महापालिकेच्या टेम्पोवर दगडफेक करून तोडफोड केली आहे. तसा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी जुना राजवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ती कांबळे कुटुंबाची एकुलती एक मुलगी होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT