VIDEO Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: पोलीस कॉन्स्टेबल आणि पत्नीकडून एसटी चालकाला जबर मारहाण

Viral video Kolhapur: सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्रातील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ कोल्हापुरमधील असल्याचे समोर येत आहे. पण नेमके काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Constable Attack Driver: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नावली, ता. पन्हाळा या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. किरकोळ कारणावरून मलकापूर आगाराच्या डेपोतील एसटी बस चालक नितीन शिरगांवकर यांना शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल असिफ महमंद कलायगार आणि त्यांच्या पत्नीने शिवीगाळ करत मारहाण केली. सध्या सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमके कारण काय?

एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून ही हाणामारी करण्यात आली. पोलिस कर्मचारी आपल्या पत्नी आणि परिवारासह बाहेर जात असताना हा प्रकार घडला आहे. सुरुवातीला किरकोळ वाद सुरु झाला. मात्र, पाहता पाहता हा वाद हाणामारीत(FIGHTING) बदलतो.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

ही धक्कादायक घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेली आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेक माध्यमांवर शेअर करण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

ही घटना व्हायरल (VIRAL) होताच नेटकरी वर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे. व्हिडिओ पाहून एका यूजरने कमेंट केली,''लाल परी मधे आम्ही पण दिवस काढलेत ड्रायवरची चूक नसतांनाबी लोकं ड्रायव्हरला मारतात. नक्कीच त्या बाईचीच चूक असेल'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''गाडी बाई चालवत असणार'' तर अनेक रागीट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT