Chhatrapati Shivaji Maharaj Statue 
महाराष्ट्र

kolhapur : गनिमी काव्याने शिवरायांचा पुतळा बसवला, पोलिसांचा हस्तक्षेप, शिवप्रेमी आक्रमक, जमावबंदी लागू

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Kolhapur : परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला. पोलिसांनी हस्तक्षेप घेतला, त्यामुळे पट्टणकोडोलीमध्ये तणाव निर्माण झालाय.

Namdeo Kumbhar

रणजित माझगावकर

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : कोल्हापुरातील पट्टणकोडोलीमध्ये शिवप्रेमींनी रात्रीमध्ये गनिमी कावा करत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला. परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळे पोलिसांनी हटवण्याचा आदेश दिला, पण शिवप्रेमींनी नकार दिला अन् पट्टणकोडोलीमध्ये तणाव झाला. आज या परिसरात तणाव वाढला, त्यामुळे प्रशासनाकडून जमावबंदी लावण्यात आली आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पट्टणकोडोलीमध्ये बसस्थानकाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) यांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला. पहाटे तीन वाजता शिवभक्तांनी शिवरायांचा चबुतऱ्यासह पूर्णाकृती पुतळा बसवला. कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसवल्यामुळे पोलिसांनी तो हटविण्याचा आदेश दिला. यावेळी परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण झाले. प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी घटनास्थळी भेट दिली. परवानगी घेऊन पुतळा बसवा, असे आवाहन त्यांनी शिवप्रेमींना केले.

शिवभक्तांनी परवानगी न घेता पुतळा उभारल्यामुळे पोलिसांनी विरोध दर्शवला. त्यानंतर परिसरात तणाव वाढला. इचलकरंजीजवळील पट्टणकोडोली येथं जमावबंदी लागू करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले. बेकायदेशीर पुतळा बसवल्या प्रकरणी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले. संपूर्ण परवानगी घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा असे पोलीस प्रशासनाचे म्हणणं आहे. तर पुतळा बसवण्यावर शिवसैनिक ठाम आहेत. त्यामुळे पट्टणकोडोलीत तणाव, चित्रीकरणास केली बंदी

पट्टणकोडोली येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होतेय. गुढी पाडव्याला शिवप्रेमींनी परवानगी न घेता पुतळा बसविल्याने पोलिसांनी हस्तक्षेप घेतला. त्यावर पट्टणकोडोली ग्रामपंचायत प्रशासनाने पुतळा देखभालीची जबाबदारी घेतली. याला सरपंच अमोल बाणदार यांनी ज्या कागदपत्रांची गरज असेल त्यास आम्ही सहकार्य करू, असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT