रणजीत माजगावकर, कोल्हापूर
कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हच्या भीषण घटनेत दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह रणजितसिंह पाटील याने दोघांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाजवळ हा थरार घडला. या अपघातात उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड या दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर पद्मसिंह पाटील घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.