Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची मोठी कारवाई! ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर: सिंधुदुर्ग येथे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर (Kolhapur) विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. आयशर टेम्पोसह ५५ लाख ४२ हजारांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. कोल्हापूर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी संशयित आरोपी संजय मारुती गवस (वय ४२) यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी पहाटे केली आहे.

मा. आयुक्त, कांतीलाल उमापसो यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवीसो यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर (Kolhapur) राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी बांदा गावच्या हद्दीत गोवा-मुंबई महामार्ग क्र. ६६ येथे पहाटे छापा टाकून अवैद्य मद्याची वाहतूक करत असताना कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीला असणाऱ्या विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या.

यात ७५० मिलीच्या एकुण १२०० बंद बाटल्या तसेच १८० मिलीच्या एकूण २१९३६ बाटली सापडल्या. या वाहणाच्या चारही बाजूला पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट चिकटवला होत्या. कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

ही कारवाई निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, आर.जी. येवलुजे यांच्यासह कॉन्स्टेबल- सुशांत बनसोडे, विलास पवार,अमोल यादव, दीपक कापसे यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री एस एस गोंदकर हे करत आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

SCROLL FOR NEXT