Kolhapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime: पुण्यानंतर कोल्हापूर हादरलं, बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार

Crime News Kolhapur: कोल्हापूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यानंतर कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.

कोल्हापूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत आरोपी तरुणीवर वारंवार बलात्कार करत होता असं तरुणीने फिर्यादीमध्ये म्हटले आहे. २०१८ पासून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीवर आरोपीने बलात्कार केला.

या घटनेप्रकरणी लक्षतीर्थ वसाहत येथील विश्वजीत सचिन जाधव या तरुणावर शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वेळा इच्छेविरुद्ध गर्भपात करायला लावल्याची धक्कादायक माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या कोल्हापूरचे शाहुपुरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. पीडित तरुणी फलटणला घरी जात होती. आरोपीने तिला खोटं बोलून शिवशाही बस फलटणला जाणार असल्याचे सांगून त्यामध्ये तिला चढण्यास सांगितले. तरुणी बसमध्ये चढल्यानंतर आरोपी तिच्यामागे गेला. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. घाबरलेली तरुणी फलटणला घरी गेली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

Monday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ५ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT