youth arrested in mobile theft case Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : मोबाईल शॉपी फोडणा-यास 24 तासांत अटक,13 मोबाईल हस्तगत; शाहूपुरी पाेलिसांची कामगिरी

Kolhapur : पोलिसांनी परिघ पूला नजीक सापळा रचून राज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे 13 मोबाईल मिळून आले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापुर जिल्ह्यात चाे-यांचे प्रमाण वाढले हाेते. विशेषत: नागरिकांचे माेबाईलची चाेरी हाेण्याचे प्रमाण वाढले हाेते. काेल्हापुर शहरातील पाच बंगला परिसरात मोबाईल चाेरी प्रकरणात एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून शाहूपुरी पोलिसांनी 79 हजार रुपयांचे 13 मोबाईल जप्त केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाहूपुरी येथील पाच बंगला परिसरातील एका मोबाईल शॉपीमधून 13 मोबाईलची चाेरी झाली हाेती. या चोरीचा छडा लावण्यात शाहूपुरी पोलिसांना 24 तासात यश आले आहे. पाेलिसांनी राज उर्फ रविराज महेश कसबेकर याला अटक केली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार राज उर्फ रविराज कसबेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. ताे चोरीचे मोबाईल विकण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानक येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. (Maharashtra News)

पोलिसांनी परिघ पूला नजीक सापळा रचून राज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे 13 मोबाईल मिळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याला याेग्य माहिती देता आली नाही. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर शाहूपुरी, राजारामपुरी, गांधीनगर पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT