Kolhapur News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News: तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, कोल्हापूरात एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट

Kolhapur: तरुणी आपल्या घरी जात असताना वाटेतच आरोपीने तिचा रस्ता अडवला.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur Crime News:

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात विविध योजना आणि अभियान राबवले जातात. मात्र माणसांच्या मनातील विकृती संपत नाही तोपर्यंत महिला सुरक्षित राहणार नाहीत. कोल्हापुरात पुन्हा एकदा एक विचित्र घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेलाय. या प्रकरणी संशयीत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ९ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास सदर घटना घडलीये. तरुणी आपल्या घरी जात असताना वाटेतच आरोपीने तिचा रस्ता अडवला. त्यानंतर मला तुझ्याशी बोलायचंय असं म्हणत त्याने तिला अज्ञात स्थळी नेलं.

त्या ठिकाणी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. पुढे आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली, अशी महिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी एक व्यक्ती वैरण घेण्यासाठी या ठिकाणी गेला होता. त्यावेळी अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला.

तरुणीची हत्या होऊन ६ दिवसांचा कालावधी झाला होता. त्यामुळे तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सदर व्यक्तीने घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलाय.

संशयीत आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. तपासादरम्यान सदर आरोपी याआधी काही प्रकरणांमध्ये गुन्हेगार असल्याचे रेकॉर्डमध्ये सापडलेय. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेणार

Maharashtra News Live Update: संजय राऊत यांच्या "बोध किर्तन" या पुस्तकाचे 31 ऑक्टोबरला प्रकाशन

Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून अटक; तिहार कारागृहात पाठवले जाणार?

SCROLL FOR NEXT