Kolhapur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: आयफोनवरून भावंडांमध्ये झाला वाद, रागाच्या भरात वडिलांनी पोटच्या लेकाला संपवलं

आयफोनवरून भावंडांमध्ये झाला वाद, रागाच्या भरात वडिलांनी पोटच्या लेकाला संपवलं

Satish Kengar

>> रणजीत माजगावकर

Kolhapur Crime News: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे धारदार शस्त्राने डोक्यात वार करत कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कागल-निढोरी राज्य मार्गावरील बामणी हद्दीतील हा तरुणाचा मृतदेह सापडला आहे.

ही धक्कादायक घटना गुरुवार एक जून रोजी समोर आली. आयफोनसाठी पैसे मागितल्याने घरात वाद झाला आणि रागाच्या भरात वडील आणि भावानेच खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अमरसिंह थोरात (वय ३० वर्ष) याचा बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह कागल-निढोरी राज्य मार्गावरील बामणी हद्दीतील एका शेतात टाकून देण्यात आला होता. तरुणाला इतर ठिकाणी मारून येथे मृतदेह आणून टाकल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

कागल पोलीस घटनास्थळी येऊन पंचनामा करताना तरुणाच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स सापडले. त्यावरुन त्याचे नाव अमरसिंह दत्ताजीराव थोरात असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तपास पथक अमरसिंह थोरात याचा पूर्व इतिहास जाणून घेण्यासाठी त्याच्या मूळ गावी गेले. अमरसिंह थोरात हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. तसेच चैनीकरिता आणि दारूच्या व्यसनाकरिता घरातील लोकांना सतत त्रास देत होता, असे समोर आले.

दरम्यान, ३० मे रोजी अमरसिंह थोरात हा आपल्या घरी गेला होता. यावेळी रात्री त्याचे आणि वडील दत्ताजीराव थोरात यांच्यात काही कारणावरून कडाक्याचे भांडण झालं होतं. त्याने आपल्या वडिलांकडे तब्बल एक लाख ५० हजार रुपये किमतीचा आयफोन घेण्याची मागणी केली. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात वडिलांनी लोखंडी पाईप सारख्या शस्त्राने डोक्यात वार केला आणि जखमी केले. डोक्यात वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन अमरसिंह थोरात हा जखमी होऊन जमिनीवर कोसळला, तरी त्याला उपचाराकरिता न नेता रात्रभर घरीच ठेवले.

यामुळे त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आले. ३१ मे रोजी सायंकाळच्या सुमारास वडील आणि त्याच्या लहान भावाने गाडीच्या डिक्कीत मृतदेह घालून कागल-निढोरी राज्य मार्गावरील बामणी हद्दीतील एका शेतात टाकून दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक जून रोजी खून झाल्याचे समोर आल्यानंतर अमरसिंह थोरात यांचे वडील आणि भाऊ यांनी घटनेच्या ठिकाणी येऊन आपणास काही माहिती नसल्याचे नाटक केले. मात्र अवघ्या २४ तासात पोलिसांनी तपास पूर्ण करत दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द

Health News: गॅस, शिंका, जांभई किंवा लघवी थांबवताय? या सवयींमुळे वाढू शकतात गंभीर समस्या

शासकीय कामासाठी मागितली २५ हजाराची लाच; गटविकास अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

Buttermilk Benefits: वजन कमी करण्यासाठी जेवल्यानंतर ताक पिण्याचा डॉक्टर का सल्ला देतात? जाणून घ्या फायदे

Dog Bite: कुत्रा चावल्यावर दुर्लक्ष करू नका! 15 मिनिटांत करा 'हे' काम, अन्यथा रेबीजचा धोका वाढेल

SCROLL FOR NEXT