Hasan Mushrif News saam tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif: सायबर गुन्हेगारांचा कहर; मंत्री हसन मुश्रीफांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट, तक्रार दाखल

Hasanb Mushrif fake fb Account: सायबर गुन्हेगारांची मंत्री, सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याची हिंमत वाढली आहे. याच सायबर गुन्हेगारांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांचं बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

kolhapur News:

बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे. सायबर गुन्हेगारांकडून बहुतांश सर्वसामान्य लोकांना टार्गेट केलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांत सायबर गुन्हेगारांची मंत्री, सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याची हिंमत वाढली आहे. याच सायबर गुन्हेगारांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांचं बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सायबर गुन्हेगारांनी थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या गुन्हेगारांनी मुश्रीफ यांच्या फेसबुक अकाऊंटचा मजकूर कॉपी करून थेट बनावट अकाऊंट तयार केलं आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दैनंदिन कामकाजाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमांतून लोक, कार्यकर्त्यांना देत असतात. अनेक मेळावे आणि पत्रकार परिषद फेसबुक लाईव्ह करतात. मात्र,सायबर गुन्हेगाराने मंत्री मुश्रीफ यांच्या बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. या बनावट अकाऊंटवरून काही कार्यकत्यांशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याप्रकरणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सोशल मीडिया हँडल करणारे सुशांत डोंगळे यांनी कागल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: पैसे वाटणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

SCROLL FOR NEXT