Kolhapur Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील उद्योजकाच्या घरात रात्री घडला थरार; अख्ख कुटुंब दहशतीत

Kolhapur News : कोल्हापुरातील तरुण उद्योजक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

रंजित माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापुरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील तरुण उद्योजक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कोल्हापुरातील शाहूपुरी इथं राहणारे तरुण उद्योजक संदीप नष्टे यांना काल रात्री एका अज्ञाताने घरात घुसून बंदुकीचा धाक दाखविला. स्वतः पोलीस असल्याची बतावणी करत या अज्ञाताने संदीप नष्टे यांच्या घरात प्रवेश केला. तसेच संदीप यांना तुमच्याबद्दल ठाणे शहरतील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून याबद्दल सेटलमेंट करावी लागेल अशी बतावणी दिली. तसेच संदीप नष्टे यांचे आई-वडील , पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना एकत्र हॉलमध्ये बोलावून सर्वांवर बंदूक रोखली. संदीप नष्टे यांच्या बद्दल अनेक तक्रारी असल्याचं हा अज्ञात व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांना सांगत होता तसेच या व्यक्तीने या सर्वांचे मोबाईल काढून घेऊन सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली.

अज्ञात व्यक्तीने संपूर्ण नष्ट कुटुंबावर बंदूक रोखल्याने संदीप नष्टे यांच्या मुलींना बेडरूम मध्ये जाऊन ही घटना संदीप यांच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना सांगितली. यावेळी संदीप नष्टे यांचे मित्र संतोष पाटील आणि त्यांचा मुलगा त्वरित त्यांच्या घरी पोहोचला. हळूहळू लोक दारामध्ये येत असल्याचे लक्षात येताच या अज्ञाताने सर्वांना बोलण्यात गुंतवून त्या परिसरातून पलायन केलं. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच त्वरित पोलिसांचा पथक नष्टे यांच्या घरी पोहोचलं.

पोलिसांनी त्वरित तपासाचे चक्र फिरवलीत तसेच शाहूपुरी चौथ्या गल्लीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. कोल्हापुरातील शाहूपुरी परिसर हा तसा गजबजलेला परिसर आहे. या परिसरात बंदूक घेऊन घरात घुसणाऱ्या या अज्ञाता विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT