Kolhapur Crime News SaamTv
महाराष्ट्र

Kolhapur Crime : पती नव्हे हा तर हैवान! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

या संतापजनक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kolhapur Latest Crime News : कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संसाराचा गाडा हाकताना पत्नी-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा वाद विकोपाला गेल्याने गंभीर गुन्हे घडतात. अशीच एक घटना कोल्हापूर येथून उघडकीस आली आहे. 

कोल्हापुरातील (kolhapur) बलिंगा परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर पती खुद्द पोलीस ठाण्यात झाला हजर झाला. या संतापजनक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या बालिंगा पुलाजवळ एका 23 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. पतीने चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पत्नीची हत्या केल्यानंतर पती हा स्वतःहून करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. दरम्यान करवीर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस (Police) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या ठिकाणी बघणाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. याबाबतचा अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत. या संतापजनक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT