Kolhapur Crime News  Sambhaji Thodrat Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur : तिहेरी हत्याकांडाने कोल्हापूर हादरलं! पतीने पत्नीसह दोन मुलांना संपवलं

कोल्हापूर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कागल इथं चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीसह दोन मुलांची निघृणपणे हत्या केली.

संभाजी थोरात

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील (Kolhapur) कागल इथं चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीसह दोन मुलांची निघृणपणे हत्या केली. पत्नी आणि मुलांची हत्या (Crime) केल्यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेमुळे कागल शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. (Kolhapur Kagal News Today)

प्रकाश धोंडीराम माळी असं आरोपीचं नाव आहे. तर पत्नी गायत्री प्रकाश माळी, मुलगी अदिती माळी आणि मुलगा कृष्णा माळी अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, आरोपी प्रकाश माळी याला आपली पत्नी गायत्रीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे आरोपी प्रकाश आणि पत्नी गायत्री यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद सुरू होता.

मंगळवारी दुपारी दोन वाजता पत्नी गायत्री फोनवर बोलत असताना त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की प्रकाश याने पत्नी गायत्रीचा गळा आवळून खून केला. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास प्रकाश याचा आठवीत शिकणारा मुलगा कृष्णा घरी आला. प्रकाश याने कृष्णाचाही गळा आवळून खून केला. (Kagal Crime News Today)

इतकंच नाही तर आरोपी प्रकाश याने रात्री 8 वाजेच्या सुमारास अकरावीत शिकणारी मुलगी आदितीचाही गळा आवळला. त्यानंतर रात्री उशीरा आरोपी प्रकाश कागल पोलिस ठाण्यात हजर झाला. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आपण तिघांचाही खून केल्याची कबूली प्रकाशने पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केल्याने कागल शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून पुढील घटनेचा तपास सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात भीषण अपघात

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

नजर होईल गरुडासारखी तीक्ष्ण! रोज खा 'हे' ५ ड्रायफ्रुट्स, भविष्यात कधीही चष्मा लागणार नाही

SCROLL FOR NEXT