Rape crime saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: संतापजनक! गतिमंद मुलीवर नराधमाने केला अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस आला प्रकार

Kolhapur News: संतापजनक! गतिमंद मुलीवर नराधमाने केला अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस आला प्रकार

Satish Kengar

>> रणजित माजगावकर

Kolhapur Crime News:

कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 54 वर्षीय नराधमाने 23 वर्षे गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पीडित युवती ही गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने संशयित आरोपी अनिल याच्या विरोधात शुक्रवारी शाहुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोन दिवस झाले तरीही पोलीसांनी संशयिताला अटक केली नसल्याने या विरोधात आज मलकापूर बंदची हाक देण्यात आली होती.

गतिमंद युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच कोणीही संशयित आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, या मागणीसाठी आज मलकापूर बंदची हाक देण्यात आली होती. (Latest Marathi News)

तर या पार्श्वभूमीवर आज शहरातील महिला, युवक, युवती व नागरिकांनी मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शहरातून मूक निषेध फेरी काढत संशयित आरोपीच्या अटकेची मागणी करण्यात आली.

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी संतप्त मागणी करीत आंदोलक महिलांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निवेदन सादर केले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशीयत आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT