Kolhapur Breaking : वारे वसाहतीत दोन गटांत तुफान हाणामारी; तलवार हल्ल्यात चार जखमी! SaamTvNews
महाराष्ट्र

Kolhapur Breaking : वारे वसाहतीत दोन गटांत तुफान हाणामारी; तलवार हल्ल्यात चार जखमी!

धारदार शस्त्रांसह काठ्यांचा वापर करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात स्थानिकांच्या प्रापंचिक साहित्याची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur) वारे वसाहतीत (Vare Colony) आज दुपारच्या सुमारास दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी गुंडाच्या सशस्त्र टोळीकडून पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्रांसह काठ्यांचा वापर करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात स्थानिकांच्या प्रापंचिक साहित्याची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. या मारहाणीत दोन्ही गटाचे मिळून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा :

घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीत (Fighting) पृथ्वी आवळे, सुजल कांबळे, दादासाहेब माने आणि एक महिला अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आणि स्थानिकांना दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात दोन्ही गटात वादविवाद झाले होते. यामुळेच दोन्ही गटात धुसफूस सुरू होती. त्याचेच पर्यवसन आज या तुंबळ हाणामारीत झाले.

यावेळी,एका गटाच्या तरुणांनी हातात हत्यारे व काठ्या घेऊन हल्ला चढवला. या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले. हल्लेखोरांनी दुसऱ्या गटातील लोकांच्या घरात घुसून घरगुती साहित्यासह दारात लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी झालेल्या ओरड्यामुळे आणि गोंधळामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मारहाणीत जखमी झालेल्यांना नागरिकांनी उपचारासाठी मिळेल त्या वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआर बाहेर देखील दोन्ही बाजूच्या नातेवाईक व मित्र परिवार यांनी गर्दी केली होती. त्यामुळे येथेही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच येथे तैनात असणाऱ्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सीपीआरमध्ये शहर पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, लक्ष्मीपुरी से पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी भेट दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT