Kolhapur Accident Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Accident : बसची वाट पाहत उभ्या मुलींच्या घोळक्यात भरधाव कार घुसली; विद्यार्थिनीचा मृत्यू, ५ जण जखमी

Kolhapur News : महाविद्यालय सुटल्यानंतर गुरुवारी सायंकाळी घरी जाण्यासाठी बसथांब्यावर याच महाविद्यालयातील मुली थांबल्या. त्याचवेळी महाविद्यालयाच्या आवारातून आलेली चारचाकी मुलींच्या घोळक्यात घुसली

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 
कोल्हापूर
: महाविद्यालय संपल्यानंतर घरी जाण्यासाठी मुली बस थांब्यावर जाऊन उभ्या राहिल्या होत्या. याच वेळी भरधाव वेगाने आलेली कार महाविद्यालयीन तरुणींच्या घोळक्यात घुसली. काही कळण्याच्या घडलेल्या घटनेने तरुणी भांबावून गेल्या होत्या. यात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुकली - परिते मार्गावरील विनंती बस थांब्याजवळ हा अपघात झाला आहे. यात प्रज्ञा दशरथ कांबळे असे मृत्यूचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती महाविद्यालय सुटल्यानंतर गुरुवारी सायंकाळी घरी जाण्यासाठी बसथांब्यावर याच महाविद्यालयातील मुली थांबल्या होत्या. त्याचवेळी महाविद्यालयाच्या आवारातून आलेली एक चारचाकी मुलींच्या घोळक्यात घुसली. या थरारक घटनेने प्रत्यक्षदर्शींच्या अंगाचा थरकाप उडाला होता. 

स्टंटबाजी करताना अपघात घडल्याची चर्चा 

दरम्यान कार चालक अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. तर तो याच महाविद्यालयात शिकत होता व मुलींसोबत त्याची ओळखही होती. त्यामुळे या परिसरात अपघातानंतर उलटसुलट चर्चा सुरू होती. प्रत्यक्षदर्शीच्या मते संबंधित चालक स्टंट करत असल्याचे सांगण्यात आले. तर काहींनी या अल्पवयीन मुलाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यात त्याचा पाय ब्रेकऐवजी अक्सिलेटरवर पडल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या अपघाताविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

गुन्हा दाखल 
भोगावती साखर कारखान्यासमोर असलेल्या बसथांब्यावर भरधाव चारचाकी विद्यार्थिनींच्या घोळक्यात घुसून झालेल्या अपघाताचे मूळ कारण शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याचे वडील आणि काका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजी केल्याच्या आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT