Kolhapur Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur Accident: बेधुंद तरुणाचा 'कार'नामा! दुकानासमोर बसू न दिल्याच्या रागातून ३ दुचाकींना उडवले; संतप्त जमावाने दिला बेदम चोप | VIDEO

Kolhapur Latest News: कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमध्ये तरुणाने बेधुंदपणे कार चालवत तीन दुचाकी उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला तसेच गाडीचीही तोडफोड केली.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, ता. २४ जून २०२४

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना समोर येत आहेत. पुण्यातील पोर्शे अपघात, नागपूरमधील मजुरांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमध्ये तरुणाने बेधुंदपणे कार चालवत तीन दुचाकींना उडवल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी इथे एका तरुणाने बेधुंदपणे कार चालवत तीन मोटारसायकली उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुपरी गावात काल रात्री हा अपघाताचा थरार घडला. दुकानाच्या दारात बसण्यास विरोध केल्याचा या तरुणाला राग आला. याच रागातून त्याने सुसाट वेगात गाडी चालवत तीन दुचाकींना धडक दिली.

या धडकेमध्ये तिनही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त जमावाने तरुणाला बेदम चोप दिला. तसेच त्याच्या कारचीही तोडफोड केली. या अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, कोल्हापुर शहरात काही दिवसांपूर्वीच हिट अंड रनची भयंकर घटना समोर आली होती. शहरातील सायबर चौकात भरधाव कारने चार वाहनांना उडवले होते. यामध्ये कार चालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

मुंबई लोकलमध्ये 'रडू नको बाळा…'वर तरुणीचा जबरदस्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

Kiara-Sidharth : लक्ष्मी आली! सिद्धार्थ बाप झाला, कियारानं दिला गोंडस मुलीला जन्म

SCROLL FOR NEXT