Kolhapur News
Kolhapur News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News : बापरे! तरुण कोसळला दरीत; 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना

साम टिव्ही ब्युरो

Accident News : कोल्हापूरमधील पन्हाळगडावर एक दुर्घटना घडली आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून एक तरुण दरीत पडला आहे. शनिवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. नागेश तरडे असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो गंभीर जखमी आहे. (Vedant Marathe Veer Daudale Saat)

आगामी मराठी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात होता. यावेळी तो फोटोग्राफीसाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडला. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.

सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत आहे.

या चित्रपटात महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर हा देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मात्र महेश मांजरेकर यांनी स्वतः त्याला या चित्रपटातून काढून टाकल्याचे म्हटले जात आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावर संभाजी राजे यांनी देखील सुरुवातीला आक्षेप घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT