kite festival in nandurbar on eve of makar sankranti 2024 saam tv
महाराष्ट्र

Kite Festival In Nandurbar: रंगीबेरंगी पंतगांनी नंदुरबारची बाजारपेठ सजली, तीन दिवस महाेत्सवाची धूम; युवा वर्गात दांडगा उत्साह

चायना मांजावर बंदी असल्याने पारंपरिक दोऱ्यांना मागणी वाढली आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

मकर संक्रांत (makar sankranti 2024) निमित्त नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवस पतंग महाेत्सव (kite festival) असल्याने नंदुरबारची बाजारपेठ विविध आकारातील रंगीबेरंगी पतंगांनी सजली आहे. युवा वर्ग पतंग खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करु लागला आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी पर्यावरण पूरक पतंग महाेत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे.

नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असून जिल्ह्यात गुजरात प्रमाणे मोठ्या प्रमाणात पतंग मोहत्सव साजरा करण्यात येत असतो. नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस पतंग मोहत्सव साजरा केला जाताे. यंदा तीन दिवस महाेत्सवाची धूम राहणार आहे. (Maharashtra News)

सध्या नंदुरबार शहरतील बाजारपेठेत पतंगाची दुकाने लागली आहेत. यावर्षी विविध आकारातील पतंग विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. यावर्षी मोठ्या आकारातील आणि कार्टून असलेल्या पतंगांना माेठा मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

पतंगांच्या खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल जिल्ह्यात होत असते. या ठिकाणी पतंगसाठी लागणारा मांजा तयार केला जाताे. यावर्षी चायना मांजावर बंदी असल्याने पारंपरिक दोऱ्यांना मागणी वाढली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी तीन दिवस संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पतंग महाेत्सवाची धूम राहणार आहे. दरम्यान पतंग महाेत्सव काळात मोठ्या प्रमाणात पोलिसांची नजर राहणार असून बंदी असलेल्या मांजा वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT