kirit somaiya 
महाराष्ट्र

सेनेतील या चाैघांचे घोटाळे जनतेसमोर आणणार; साेमय्यांचा दावा

जयेश गावंडे

अकोला : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या चार महान शिवसैनिकांचे shivsainik घोटाळे जनतेसमोर आणणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या kirit somaiya यांनी आज (शुक्रवार) अकोल्यात केला. साेमय्या हे वाशीम जिल्हा दाै-यावर आहेत. त्यापूर्वी त्यांनी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधला.

साेमय्या म्हणाले खासदार भावना गवळी यांनी केलेला घोटाळा उघडकीस आणण्यासाठी मी वाशीमला निघालाे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत समुद्र किनाऱ्यावर बंगला बांधला आहे. ताे बंगला लवकरच जमीनदोस्त करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. मी काही दिवसांपुर्वीच तेथे जाऊन एका सुनावणीस उपस्थित राहिल्याचेही त्यांनी नमूद केले. या आठवड्यातच त्याला मुहर्त लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान त्यांना जनशीर्वाद यात्रेवरून विचारलेल्या एका प्रश्नावर साेमय्या यांनी राज्य सरकावर ताशेरे आेढले. ते म्हणाले हे सरकार डाकूचे सरकार आहे. हम करेसो कायदा असे हे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान खासदार भावना गवळी, मिलींद नार्वेकर, अनिल परब तसेच यशवंत जाधव यांचे घाेटाळे आपण उघडकीस आणणार असल्याचे साेमय्या यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT