धक्कादायक : संपत्तीसाठी शेजाऱ्याने केली बापलेकाची हत्या; मृतांचे शेअर्स विकून घेतला बंगला, रेंज रोव्हर अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

धक्कादायक : संपत्तीसाठी शेजाऱ्याने केली बापलेकाची हत्या; मृतांचे शेअर्स विकून घेतला बंगला, रेंज रोव्हर

हत्याकांडानंतर कापडणीस यांचे शेअर्स (Shares) विकून आरोपी राहुलने आलिशान रेंज रोव्हर आणि एक बंगला देखील विकत घेतला.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : 'शेजारीचं बनला वैरी' असं एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीने थंड डोक्याने प्लॅनिंग करून शेजाऱ्यांची संपत्ती हडपण्यासाठी नाशिकमध्ये बाप-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिकमधील (Nashik) गंगापूर रोड परिसरात मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि मुलगा डॉ. अमित कापडणीस हे राहत होते त्यांच्या शेजारी राहुल जगतापला नावचा एक व्यक्ती राहत होती.

आणि याच राहुल जगतापने कापडणीस याची कोट्यावधींची संपत्ती हडप करण्यासाठी अत्यंत रहस्यमयरीत्या मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि मुलगा डॉ. अमित कापडणीस यांची हत्या केली आणि हत्याकांडानंतर कापडणीस यांचे शेअर्स (Shares) विकून आरोपी राहुलने आलिशान रेंज रोव्हर आणि एक बंगला देखील विकत घेतला.

दरम्यान, आपण केलेला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून या बाप लेंकांचा मृतदेह मृतदेह परजिल्ह्यात फेकून जाळल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना तब्बल 2 महिन्यानंतर उघडकीस आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

SCROLL FOR NEXT