CCTV Footage माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद हादरले! महाविद्यालयातून २०० फूट फरफटत नेऊन १९ वर्षांच्या तरुणीची निर्घृण हत्या (Video)

शहरात एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: आज दुपारी औरंगाबाद जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील देवगिरी कॉलेज परिसरात एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला आहे. नराधमाने भर दिवस कॉलेजमधून तिला 200 फूट खेचत नेले. त्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला. या घटनेनंतर रचनाकार कॉलोनी देवगिरी कॉलेजमध्ये एकच खळबळ माजली आहे.

ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग (वय 19) असे विद्यार्थींनीचे नाव आहे. ती विद्यार्थिनी बीबीएच्या (BBA) प्रथम वर्गात शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली. आज दुपारी घडलेली ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली, या भयानक घटनमुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, ते दोघेही परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये गेले होते. त्यावेळेस त्यांच्यात वाद झाला असावा आणि त्यानंतर तो मुलगा त्या मुलीला घटनास्थळी ओढत घेऊन गेला. एका ठिकाणी नेऊन तिचा खून केला. या घटनेचा एक CCTV व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणीला जबरदस्तीने ओढत घेऊन जाताना दिसून येत आहे. तिच्या पाठीवर सॅक आहे. त्यानंतर काही आजूबाजूचे लोक घटनास्थळी पळत जाताना दिसून येत आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांना तरुणीचा मृतदेह आढळला. यावेळी तरुणीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही होत्या.

पहा व्हिडीओ-

या घटनेनन्तर शहरात खळबळ उडाली आहे. अद्याप मात्र तो मुलगा कोण आहे? नेमकी घटना काय घडली? या सर्व घटनेची माहिती पोलीस घेत आहेत. यासाठी औरंगाबाद पोलिसांनी चार पथक तैनात केली आहेत. याचा संपूर्ण तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT