Nanded Crime संतोष जोशी
महाराष्ट्र

नांदेड पुन्हा हादरले! शहरात भर रस्त्यात वर्तमानपत्राच्या संपादकाची हत्या

टीव्हीच्या आवाजावरून झाला होता वाद

संतोष जोशी

नांदेड: खुनाच्या घटनेने नांदेड पुन्हा एकदा हादरले आहे. नांदेड (Nanded) मध्ये एका साप्ताहिकाच्या संपादकाचा (newspaper editor) चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना काल रात्री ९ वाजेच्या सुमारास मिलगेटरोडवर घडली आहे. प्रेमानंद जोंधळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेजाऱ्याला टिव्हीचा (TV) आवाज कमी करण्यास सांगितल्याने दोघांत वाद होत होते.

हे देखील पाहा-

या गोष्टीचा राग मनात धरुन शेजारी राहणाऱ्या कृष्णा हातांगळे याने प्रेमानंदला रस्त्यात गाठून छाती, पोटावर असे ८ ठिकाणी चाकुने भोसकले आणि आरोपी फरार झाला आहे. पोलिस (Police) आणि स्थानिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेमानंद यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात (hospital) दाखल केले. मात्र, प्रेमानंद यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, या प्रकरणात मारेकरी कृष्णा हातांगळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच दुपारी तुप्पा येथे एकावर गोळीबार (Firing) झाला होता आणि रात्री खुनाच्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Ashok Kharat Case: कोडवर्डवाले २५०० नंबर; अशोक खरातच्या मोबाइलमधील मायाजाल पाहून पोलीसही चक्रावले

मोठी दुर्घटना! कराडमध्ये केमिकल बनवणाऱ्या कंपनीत स्फोट अन् अग्नितांडव, पाहा व्हिडिओ

Kerosene: पेट्रोल- LPG नंतर आणखी एक दिलासादायक बातमी, रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय

Summer Hair Care : सततच्या केस गळतीने हैराण झालात? १० दिवसांत येईल जाडजुड वेणी, फक्त करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

SCROLL FOR NEXT