Nanded Crime संतोष जोशी
महाराष्ट्र

पैशाच्या हव्यासापोटी परप्रांतीय पिता-पुत्राचा नांदेडमध्ये खून; ...अन् झाला हत्येचा उलघडा !

कुंडलवाडी येथील घटना

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

संतोष जोशी

नांदेड: नांदेडमध्ये पैश्याच्या हव्यासापोटी परप्रांतीय पिता-पुत्राचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कुंडलवाडी येथे ही घटना घडलीय. राजस्थान येथील मजूर पिक काढणीची मशीन घेऊन कुंडलवाडी येथे आले होते. पैश्याच्या कारणावरून मजूरांमध्ये भांडणं झाली यातून इतर मजुरांनी (45) वर्षीय रशीद खान आणि (17) वर्षीय अमजद खान यांचा लोखंडी राॅड, काठ्याने मारहाण करुन खुन करण्यात आला.

पुरावा नष्ट करण्यासाठी रशीद खानचा मृतदेह पुरला तर अमजद खान याचा मृतदेह यवतमाळ जिल्ह्य़ात नेऊन टाकला. रशीद खान यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आलयं. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी तपास चक्रे फिरवून पिता- पुत्राच्या खुनाचा छडा लावलाय.

हे देखील पहा-

या प्रकरणात पोलिसांनी पाचजणांना अटक केलीय. रशीद खान यांचे कुंडलवाडी जवळ पुरलेले मृतदेह काढला तर यवतमाळ मधून अमजद खान याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलाय. कुंडलवाडीत पिता पुत्राच्या खुनाची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT