Navneet Rana Saam tv
महाराष्ट्र

Navneet Rana Threatened: खळबळजनक! खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

Maharashtra Political News: धमकी प्रकरणी तक्रार दाखल करुन सदर व्यक्तीता तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.

Ruchika Jadhav

Navneet Rana News:

राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे फोन येत असल्याने नवनीत राणा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच धमकी प्रकरणी तक्रार दाखल करुन सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

नवनीत राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून 088055 41949 संपर्क क्रमांकावरून कोणीतरी विठ्ठल राव नामक व्यक्तीचा मला कॉल येत होता. या व्यक्तीने तिवसामधून मी बोलतो आहे असं सांगितलं. तो मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे. तु गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारधर चाकुने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही. तसेच फोनवर अश्लील शिवीगाळ करुन खालच्या भाषेचा वापर केला, असंही नवनीत राणांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.

अशा माथेफिरू भामट्याला त्वरित जेरबंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी करावीय. तसेच त्या व्यक्तीचा ताबडतोब शोध घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडून त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलीये. राजापेठ पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.

साल २०२१ मध्ये देखील नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मंत्र्यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना देखील तुमचाही दाभोलकर होणार अशी धमकी देण्यात आली होती. आता नवनीत राणा आलेल्या धमकीमुळे पुन्हा एकदा खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी मतदानाचा अधिकार बजावलं

Maharashtra Marriage Crisis : लग्नाच्या नावाखाली दलालांनी लुटलं, तरुणांनी केली आत्महत्या, राज्यातील भीषण वास्तव

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, ट्रकच्या धडकेनंतर कारने घेतला पेट; ११ जण जिवंत जळाले

Akola Bhondubaba: महाराष्ट्राला अंधश्रद्धेचा विळखा, भोंदूबाबाचा चिमुकल्यांशी जीवघेणा खेळ; संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Homemade Conditioner Tips: केस धुतल्यानंतर लावा खास 'होममेड कंडिशनर', केस होतील मऊ आणि मुलायम

SCROLL FOR NEXT