Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : प्रियकराच्या मदतीने पतीचं अपहरण, नंतर जिवे मारण्याचा प्रयत्न; आता आली पश्चातापाची वेळ

नांदेड मधील धक्कादायक घटना

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

Nanded Crime : प्रियकराच्या साथीने पतीचे अपहरण करुन खुन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नांदेड (Nanded) मध्ये घडली आहे. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी इतक्या सराईत पद्धतीने एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने पतीचे अपहरण केले. याप्रकरणी  महिलेसह चौघांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना एका कर सल्लागारासोबत घडली आहे. (Nanded Latest Crime News)

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हाटकरवाडी येथील गितांजली हाके हीचा विवाह भोकर येथील कर सल्लागार असलेल्या प्रकाश श्रीरामे या व्यक्तीशी 20 मार्च 2006 मध्ये झाला होता. त्यांना15 वर्षाचा मुलगा आणि 10 वर्षाची मुलगी आहे. एक महिन्यापुर्वी दोघांचे भांडण झाले होते. त्यामुळे दोघीही वेगवेगळे राहत होते.

काल पत्नी प्रकाश श्रीरामे यांच पत्नी गितांजली, प्रियकर बालाजी जाधव, दिलीपसिंग पवार, आवतारसिंग रामगाडीया आणि अमोल बुक्तरे यांनी नांदेड येथून अपहरण केलं. यावेळी पत्नी गितांजलीने प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी पतीला जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केली. त्यानंतर पतीला औंढा जाणाऱ्या रस्त्यावर नेऊन गाडीतून उतरून टाकले.

श्रीरामे यांनी तातडीने भाग्यनगर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ही तातडीने तपास चक्रे फिरवत पत्नी गितांजली, प्रियकर बालाजी जाधव याच्यासह चारजणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पत्नीनेच पतीचं अपहरण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या या घटनेनं खळबळ उडाली. या हैराण करणाऱ्या घटनेचा तपास भाग्यनगर पोलीसांनी  फिल्मीस्टाईलमध्ये दोन तासामध्ये लावला आणि या घटनेतील आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT