जुन्या वादातून अपहरण करून एकवीस वर्षीय तरुणाची हत्या Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: हंडरगुळी येथील तरुणाचा अपहरण करून खून; गुन्हा दाखल

पोलिसांचा तपास सुरू असताना सदरील तरुणाचा मृतदेह तिरु प्रकल्पाच्या पाण्यात आढळून आला.

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील उदगीर (Udgir) तालुक्यातील हंडरगुळी येथील गणेश पांडुरंग दापके हा तरुण 31 जानेवारी पासून बेपत्ता होता. सदरील तरुण बेपत्ता असल्याची तक्रार वाढवणा पोलीस (Police) ठाण्यात देण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने वाढवणा पोलीस तपास करीत होते. पोलिसांचा तपास सुरू असताना सदरील तरुणाचा मृतदेह तिरु प्रकल्पाच्या पाण्यात आढळून आला.

हे देखील पहा -

मयत गणेश पांडुरंग दापके यांचा विजय शिवाजी हंगरगे, बालाजी शिवाजी हंगरगे, सुभाष गोविंद हंगरगे, संतोष गोविंद हंगरगे, त्र्यंबक दिगंबर घोगरे आणि अन्य एक व्यक्ती यांनी जुन्या भांडणाचे कुरापत काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून खून केला. खुनाचा पुरावा नाहीसा करण्याच्या हेतूने गणेश पांडुरंग दापके यांचा मृतदेह तिरु प्रकल्पाच्या पाण्यात नेऊन टाकला अशी फिर्याद पांडुरंग बाजीराव दापके यांनी दिली.

या प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात सहा जणांवर रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT