Instagram, Kharghar, Navi Mumbai Saam TV
महाराष्ट्र

Instagram : फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत उकळले 12 लाख, मैत्रिणीसह दाेघांवर गुन्हा; एक अटकेत

सोशल मीडियावर खाजगी माहिती शेअर करताना काळजी घेण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : खारघरमध्ये (kharghar) एक महिलेला (women) इन्स्टाग्रामवरील मैत्री चांगलीच अडचणी ठरली आहे. इन्स्टाग्रामवर एका महिलेशी मैत्री झाल्यावर दोघांमध्ये चांगले नाते निर्माण झाले. नाते इतके घट्ट झाले की दोघींनी एकमेकांना आपले खाजगी फोटो देखील शेअर केले.

त्यानंतर इन्स्टाग्रामवरील (instagram) मैत्रिणीने ते खाजगी फोटो तिच्या पुरुष मित्रांना पाठवले. संबंधित मित्रांनी महिलेला तिचे खाजगी फोटो दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत टप्प्याटप्प्याने तब्बल 12 लाख रुपये उकळले.

पैशाची मागणी वाढतच गेल्याने महिलेनं खारघर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. खारघर पोलिसांनी इन्स्टाग्राम वरील मैत्रीण आणि तिच्या दोन पुरुष मित्रांवर फसवणुकीचा आणि विनयभंगचा तसेच आयटी कायदानूसार गुन्हा दाखल.

याप्रकरणी एकाला हिमाचल प्रदेश मधून अटक करण्यात आली. अन्य दोन संशयित आरोपींचा पाेलीस तपास करीत आहेत. यावेळी सोशल मीडियावर खाजगी माहिती शेअर करताना काळजी घेण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Tourism : कसारा घाटाजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंग करताना दिसतो कळसूबाई शिखराचा सुंदर नजारा

SCROLL FOR NEXT