भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या महिन्याभरापासून रोज नवनवे धक्कादायक खुलासे होतायत...अशातच खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूवरून घातपाताचा संशय बळावलाय...तीन दिवसांपूर्वी ईडी चौकशी झालेल्या शेळकेंना पुरावे नष्ट करण्यासाठी संपवण्यात आलं का? आणि खरातच्या इतर ट्रस्टींवर कारवाई कधी होणार? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय...
पुरावे नष्ट करण्यासाठी शेळकेंचा घात? दरम्यान खरात प्रकरणात शिवनिका ट्रस्टवरील विश्वस्तांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही... त्यामुळे मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यात ज्यापद्धतीनं साक्षीदारांना संपवण्यात आलं होतं, तोच प्रकार खरात प्रकरणात सुरु असल्याचा संशय राष्ट्रवादीच्या सुनील मानेंनी व्यक्त केलाय...
दुसरीकडे खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंना खरातकडे येऊन काळ्या जादूसाठी बोटं कापणाऱ्या नेत्यांची शेळकेंना माहिती होती, त्यामुळे त्याचा घात करण्यात आला का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय..
शेळकेंकडे बोट कापणाऱ्या नेत्यांची माहिती'
दरम्यान खरातच्या शिवनिका ट्रस्टवरील विश्वस्त कोण आहेत... पाहूयात...
डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके ( विद्यमान उपाध्यक्ष ) शिर्डीतील मोठं उद्योजक असून , जितेंद्र यांचे भाऊ महेंद्र शेळके खरातचे पार्टनर होते..
नामकर्ण यशवंत आवारे ( माजी सरचिटणीस ) - सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन असून जेष्ठ उद्योजक आणि जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष.
कल्पना अशोककुमार खरात (विद्यमान सरचिटणीस ) - भोंदू अशोककुमार खरातची पत्नी असून खरातच्या अनेक मालमत्ता पत्नीच्या नावावर होत्या..
रुपाली निलेश चाकणकर ( विद्यमान सदस्य ) - माजी महिला आयोग अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष होत्या...
सुभाषराव केशवराव गमे ( विद्यमान सदस्य ) - शिर्डी विमानतळ जवळलील केलवड येथील रहिवासी, विखे पाटलांचे समर्थक आणि प्रगतशील शेतकरी आहेत...
ललित प्रकाश पोफळे ( CA ) ( विद्यमान सदस्य ) - पुण्यातील रहिवासी असून खरातच्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्याचा सीए म्हणून काम करायचा.
डॉ. नंदकिशोर तुळशीदास कातोरे ( विद्यमान सदस्य ) - नाशिकमधील नाशिक रोड परिसरात पोट विकार तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत...
दरम्यान खरात प्रकरणात आतापर्यंत ट्रस्टी आणि खरातचा CA असणाऱा ललित पोफळे यांच्या घरावर ईडीनं छापा टाकून 42 लाखांची रोकड जप्त केली होती...तर दुसरे ट्रस्टी डॉ. नंदकिशोर कातोरेंनी खरात पोटाच्या विकाराच्या उपचारासाठी आपल्याकडे येत असल्याचं सांगून विश्वस्त होण्यासाठी दबाव टाकल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं...तर दुसरीकडे खरातची बायको गेल्या दोन आठवड्यांपासून फरार आहे. मात्र पोलिसांना अजूनही तिचा मागमूस लागलेला नाही. खरातसोबत अनेक बड्या अधिकारी आणि नेत्यांचे संबंध असल्याचं पुढं आलं. मात्र अजूनपर्यंत ना ट्रस्टींवर कारवाई झाली ना इतर बड्या धेडांवर....त्यामुळे या खरातच्या लाभार्थ्यांवर कधी कारवाई होणार य़ाकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.